प्रतिनिधी/ बेळगाव
दुरुस्तीच्या कारणास्तव सोमवार दि. 21 रोजी शहराच्या दक्षिण भागात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 4 यावेळेत वीजपुरवठा बंद राहणार आहे.
नवी गल्ली, बसवाण गल्ली, गणेशपूर गल्ली, सराफ गल्ली, बिच्चू गल्ली, कचेरी गल्ली, नार्वेकर गल्ली, बाजार गल्ली शहापूर, नाथ पै सर्कल, भारतनगर, रयत गल्ली, भाग्यनगर, अनगोळ मेन रोड, अनगोळ-वडगाव रोड, उद्यमबाग, राणी चन्नम्मानगर, एसबीआय कॉलनी, सुभाषचंद्रनगर, राघवेंद्रनगर, वसंतविहार कॉलनी, मजगाव, रायण्णानगर, लक्ष्मी गल्ली, तानाजी गल्ली, गंगाई गल्ली, गजानननगर, महावीरनगर, कलमेश्वर या परिसरात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.









