प्रतिनिधी/ बेळगाव
तिसऱ्या रेल्वेगेट येथे उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलावर पुन्हा एकदा खड्डयांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. बेळगाव, खानापूर, गोवा, तसेच औद्योगिक वसाहतीला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावरून होणारी वाहतूक प्रचंड प्रमाणात आहे. तसेच अनगोळ चौथ्या रेल्वेगेटवरील वाहतूक पूर्णपणे या रस्त्यावरून वळविण्यात आल्याने दिवसभर या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत. त्यातच अवजड वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात आहे.
गेल्या सात-आठ महिन्यांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण, तसेच रस्त्यावर पडलेले ख•s बुजविण्यात आले होते. पण यंदाच्या महिन्याभराच्या पावसात या रस्त्याची अक्षरश: दैना उडाली आहे. टिळकवाडी भागातून उड्डाणपुलावर जाताना रस्त्याची अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. जाताना डाव्या बाजूला उतारतीला पावसाच्या वाहत्या पाण्याने पाट निर्माण झाला आहे आणि त्यात खळगी तयार झाली आहे. त्यामुळे रस्ता एका बाजूने खचला आहे तर मागीलवेळी घालण्यात आलेली खडी उखडली असून त्यामध्ये ख•s निर्माण झाले आहेत.
याच रस्त्याच्या मध्यभागी मोठे ख•s पडल्याने त्यामध्ये पेव्हर्स टाकण्यात आले आहेत. रस्त्यावर अपघात होऊ नये म्हणून चक्क बॅरिकेड्स उभे करण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालविताना याचा त्रास होत आहे. सकाळ आणि संध्याकाळ पुलावर प्रचंड प्रमाणात वाहनांच्या रांगा पहावयास मिळत आहेत. लवकरात लवकर संबंधित अधिकाऱ्यांनी या रस्त्यावरील ख•s बुजवून डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांतून करण्यात येत आहे.
आता धुळीचे साम्राज्य
गेल्या चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने ऊन पडत आहे. या रस्त्यावर पडलेल्या ख•dयांमुळे आणि उखडलेल्या खडीमुळे वाहने जात असताना धूळ आणि बारीक माती मोठ्या प्रमाणात उडत आहे. त्यामुळे दुचाकीस्वार, सायकलस्वार, रिक्षाचालक यांना याचा फटका बसत आहे. धूळ आणि मातीचे कण डोळ्यात जात आहेत.









