कोल्हापूर / अवधुत शिंदे :
रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ता, अशी अवस्था कोल्हापूर शहरातील उच्चभ्रू वस्ती असणाऱ्या आदित्य कॉर्नर ते बेकर गल्ली पर्यंतच्या रस्त्याची झाली आहे. या मार्गावरती शाळा, कॉलेज असल्याने येथून दररोज हजारो विद्यार्थ्यांची ये-जा होत असते. तसेच या मार्गावरती अनेक हॉटेलस्, फुड स्टॉल असल्याने या ठिकाणी खवय्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मात्र, खड्ढ्यामुळे हा रस्ता धोकादायक बनला आहे.
रेल्वे स्टेशन, मध्यवर्ती बस स्थानकाला जोडणारा हा रस्ता आहे. या रस्त्यावर गॅस पाईप लाईन, अमृत जल योजनेचे काम सुरु होते. ते काम पूर्ण होउढनही रस्त्याचे काम पूर्ण केलले नाही. रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने त्यामध्ये पावसाचे पाणी साचत आहे. चिखलामुळे रस्ता निसरडा झाला आहे. यामुळे वाहनधारकाला खड्ढ्यांचा अंदाज येत नसल्याने गाडी खड्यात आपटून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहेत.
- रस्त्याच्या दोन्ही बाजूस दुकाने
आदित्य कॉर्नर ते बेकर गल्ली या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूस हॉटेल्स आणि फूड स्टॉल आहेत. यामुळे येथे खवय्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या ठिकाणी येणारे लोक गाडी रस्त्याशेजारी पार्क करतात. रस्ता खराब असल्याने येथून वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे.
- रस्त्यावर मोठे खड्डे
या मार्गावराती गॅस पाईप लाईन, अमृत जल योजनेचे काम सुरु होते. या कामासाठी रस्ता खोदला होता. या योजनेचे काम पूर्ण झाले पण रस्ता तसाच राहिला. रस्ता खोदल्याने येथे मोठ मोठे खड्डे पडले आहेत. पाऊस पडल्यावर या खड्यांमध्ये पाणी साचते तसेच हा रस्ता निसरडा झाला आहे. यामुळे खड्याचा अंदाज येत नाही. गाडी चालवताना वाहनधारकांना या खड्यांचा अंदाज येत नाही. यामुळे या ठिकाणी छोटे मोठे अपघात होत आहेत.
- वाहतुकीची कोंडी
हा रस्ता रेल्वे स्टेशन, मध्यवर्ती बस स्थानकाला जोडणारा असल्याने तसेच या मार्गावरुन पुढे शाळा, कॉलेज असल्याने या ठिकाणी दररोज हजारो विद्यार्थ्यांची ये जा होत असेते. येथील रस्त्याचे काम न केल्याने वाहतूक संथ गतीने होते. यामुळे वाहतूक कोडी मोठ्या प्रमाणात होते. नागरिकांना याचा प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत आहे.
- अपघाताचा धोका
दाभोळकर कॉर्नर सिग्नल ते आदित्य कॉर्नर या मार्गावरीत रस्त्याच्या बाजूला पथ दिवे नसल्याने आणि येथील रस्ता खराब असल्यामुळे येथे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनधारकांन रस्त्याचा अंदाज येत नाही यामुळे येथे छोटे मोठे अपघात होत आहेत.
या रस्तावर मोठे खड्डे पडले आहेत. यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने गाडी चालवताना खड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. तरी प्रशासनाने लवकरात लवकर यावर तोडगा काढण्याची गरज आहे.
-अनिकेत शिंदे, रहिवासी








