कोल्हापूर :
कोल्हापूर शहरातील रहदारीचा प्रमुख रस्ता म्हणजे रेल्वे फाटक परिसर. एसटी बसस्थानक असो की रेल्वे स्टेशन याच रस्त्याने बहुतांश प्रवाशांना जावे लागते. तरीदेखील 12 महिने या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य असते. या खड्ड्यांमुळे अनेकदा प्रवाशांचा अपघातही झाला आहे. तरीदेखील महापालिका प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.
रेल्वे फाटक परिसरात रात्री उशिरापर्यंत वाहनांची येजा सुरू असते. रेल्वे फाटक परिसरात भाजी व फळ विक्रेत्यांचे स्टॉलची संख्या जास्त आहेत. मुख्य मार्ग असल्याने पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत वाहनांची गर्दी असते. रेल्वे, एस. टी. बसमधून येणारे प्रवासी याच मार्गाने येत असतात. तर काही बाहेरगावी जाणारे आणि बाहेरगावातून कोल्हापूरला येणाऱ्या लोकांना या रस्त्यावरूनच प्रवास करावा लागतो. परिणामी हा रस्ता दर्जेदार व्हावी ही नागरिकांची अपेक्षा असते. परंतू रस्त्याचे काम केल्यानंतर महिन्याभरात पुन्हा जैसे थे खड्डे पडलेले असतात. नागरिकांच्या तक्रारीवरून अनेकवेळा महापालिकेने या रस्त्याची डागडुजी केली आहे. परंतू सगळाच खर्च केलेला पैसा पावसाच्या पाण्यात खड्डे पडल्याने कोठे गायब झाला तेच कळले नाही. खड्ड्यात गाड्या गेल्याने अनेकता अपघातही झालेला आहे. तरीदेखील महापालिका प्रशासन या रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

- वाहनधारकांना करावी लागतेय कसरत
रेल्वे फाटक परिसरातील सर्वच रस्ते मुळात अरूंद आहेत. त्यात रस्त्याच्या दुतर्फा विक्रेत्यांची गर्दी असते. त्यामुळे वाहनधारक असो किंवा पादचारी यांना रस्त्यावरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागते. रस्त्यावरील खड्डा चुकवायचा असेल तर वाहनधारक किंवा परिसरातील विक्रेत्याला गाडी टच होवून अपघात होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यातून प्रवास करताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते.

- व्यावसायिकांची संख्या अधिक
रेल्वे फाटक ते राजारामपुरीपर्यंत रहिवाशांपेक्षा व्यावसायिकांची संख्या अधिक आहे. या व्यावसायिकांना या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे फटका बसत असल्याचेही बोलले जाते. या परिसरात शाळा-कॉलेजदेखील आहेत. विद्यार्थी, ग्राहक आदींची नेहमीच या रस्त्यावर गर्दी असते. हा व्यवसायिक परिसर असला तरी शहराच्या मुख्य भागात असल्याने रस्तयाची दुरूस्ती करण्याची गरज आहे.
- महापालिका प्रशासनाची अनास्था
रेल्वे स्टेशन व बसस्थानक जवळ असल्याने सर्व केएमटी याच रस्तयाने जात असतात. मुख्य स्थान असल्याने सर्व प्रवासी रेल्वे फाटक केएमटी थांब्यावरून जातात. त्यामुळे लोकांना प्रवास करण्यासाठी केएमटीचा प्रवास परवडण्यासारखा असतो. त्यामुळे अनेक प्रवाशी या केएमटी थांब्यावरून प्रवास करतात. तरीदेखील महापालिकेला हा रस्ता कायमस्वरूपी सुस्थितीत ठेवावा असे वाटत नाही.








