सिद्धेश्वर ग्रॅनाईट चषक बेळगाव टी-20 क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : युनियन जिमखाना आयोजित सिद्धेश्वर ग्रॅनाईट पुरस्कृत सिद्धेश्वर ग्रॅनाईट चषक बेळगाव टी-20 लीग क्रिकेट स्पर्धेत रविवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात पोतदार रॉयल्स सीसीआयने साई फार्म स्पोर्ट्स क्लब संघाचा व रोहन ट्रेडर्स बीएससी संघाने इंडियन बॉईज हिंडलगा संघाचा पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. पोतदार रॉयल सीसीआय संघाने प्ले ऑफ फेरीत प्रवेश केला. आदर्श हिरेमठ ( पोतदार) आकाश कटांबळ (बीएससी) याना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात पोतदार रॉयल्स सीसीआय संघाने साई फार्म स्पोर्ट्स क्लब संघाचा 12 धावांनी पराभव केला. पोतदार रॉयल्स सीसीएस संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 138 धावा केल्या. त्यात आदर्श हिरेमठने 2 चौकार एक चौकारांसह 40, अभिषेक देसाईने 3 चौकार एक षटकारांसह 28, रुद्रगौडा पाटीलने 2 षटकार व 2 चौकारांसह 25, अंगदराज हित्तलमनीने 21 धावा केल्या. साई फार्म स्पोर्ट्स क्लब संघातर्फे वैभव कुरीबागीने 22 धावांत 4 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना साई फार्म स्पोर्ट्स क्लब संघाने 20 षटकात 4 बाद 126 धावाच केल्या. त्यात वैभव कुरीबागीने 4 चौकार 2 षटकारांसह 58, रामलिंग पाटीलने 35, रोहित पोरवालने 16 धावा केल्या. पोतदार रॉयल्स तर्फे केदारनाथने 2 गडी बाद केले.
दुसऱ्या सामन्यात रोहन ट्रेडर्स बीएससी संघाने इंडियन बॉईज हिंडलगा संघाचा 27 धावाने पराभव केला. रोहन ट्रेडर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 गडीबाद 165 धावा केल्या. त्यात कर्णधार सुजय सातेरीने 4 चौकार 3 षटकार 46, राहुल नाईकने 3 चौकार व 3 षटकारांसह 42, आकाश कटांबळेने 14 चेंडूत 3 चौकार 4 षटकारांसह 41 धावांचे योगदान दिले. इंडियन बॉईज हिंडलगा संघातर्फे सुधीर गवळी, सुशांत कोवाडकर, विजय पाटील व तनिष्क नाईक यांनी प्रत्येकी 2 गडीबाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना चांगल्या सुरुवातीनंतर इंडियन बॉइज हिंडलगा संघाचा धाव गडगडला. 20 षटकात 9 गटीबाद 138 धावा केल्या. कर्णधार तनिष्क नाईकने 5 चौकार 2 षटकारांसह 50, परीक्षित उकुंदीने 22 धावा केल्या. रोहन ट्रेडर्स बीएससी संघातर्फे कृष्णा बागडेने 18 धावांत 4 तर सौरव सामंतने 2 गडीबाद केले, प्रमुख पाहुणे आरती पोरवाल पूजा मिरजी मेघा अर्कसालि यांच्या हस्ते सामनावीर आदर्श हिरेमठ व इम्पॅक्ट खेळाडू वैभव कुरीबागी यांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले. प्रमुख पाहुणे प्रशांत कुंदप प्रशांत लायंदर व अनिल असलकर यांच्या हस्ते सामनावीर आकाश कटांबळे व इम्पॅक्ट खेळाडू कृष्णा बगडी यांना चषक देऊन गौरवण्यात आले









