मराठा क्रांती मोर्चाच्या सातारा येथील बैठकीत घेतला ठराव
प्रतिनिधी/ सातारा
राजकीय आरक्षण रखडले होते, तेव्हा ज्या प्रमाणे विरोधी पक्षाला विश्वासात घेत राज्यातील सर्व निवणूका पुढे ढकलल्या होत्या. त्याचप्रमाणे मराठा आरक्षण होईपर्यत मेघा नोकरभरती प्रक्रिया पुढे ढकलावी, अन्यथा गाव पातळीपासून राज्य पातळीपर्यत मराठा क्रांती मोर्चाच्या या केटरबेस संघटनेंच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षासह विरोधकांना सुद्धा राज्यातला मराठा समाज धडा शिकवेल. त्याची पूर्ण तयारी राज्यात करण्यासाठी सातारा जिह्यात गाव पातळीपासून केडर निर्मीतीची सुरुवात साताऱयात मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत करण्यात आली.
स्वराज्य सांस्कृतिक भवन येथे आयोजित मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत जिह्यातील सर्वच तालुक्यातील मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत मराठा आरक्षणाशिवाय मेगा नोकर भरती राज्य सरकारकडून राबवण्याचा घाट घालत आहे. त्याला राजधानी सातारा जिह्यातील सर्व तालुक्यांतून मराठय़ांचा प्रखर विरोध होत आहे. राजकीय आरक्षण रखडले होते. तेव्हा ज्या प्रमाणे विरोधी पक्षाला विश्वासात घेत राज्यातील सर्व निवडणूका पुढे ढकलल्या गेल्या. त्याचप्रमाणे मराठा आरक्षण होईपर्यत मेगा नोकरभरती प्रक्रिया पुढे ढकलावी, अन्यथा गाव पातळीपासून राज्य पातळीपर्यंत मराठा क्रांती मोर्चाच्या या केटरबेस संघटनेच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षासह विरोधकांना सुद्धा राज्यातला मराठा समाज धडा शिकवील. त्याची पूर्ण तयारी राज्यात करण्यासाठी राजधानी सातारा जिह्याने गाव पातळीपासून केडर निर्मीतीचा प्रारंभ केला आहे.
या संघटनेमध्ये सारथी, आप्णा साहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, ऍट्रासिटी, नव उद्योजक निर्मीती साठी प्रयत्न केले जाणार आहे. शासकिय, निमशासकिय, नोकरदार यांच्या समस्या वर मदत, शेतकरी समस्यावर तोडगे, डॉक्टर, वकिल आदींचे स्वतंत्र केडर, गडकोट संवर्धन, स्त्राr सबलीकरणासाठी त्यांची स्वतंत्र महिला मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र व युवकांसाठी युवा मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्राची निर्मीती करून या वरील विषयांसाठी स्वतंत्र यंत्रणा सर्वानुमते निर्माण केली जाणार आहे. त्याला सर्व समावेशकता देण्याचे उद्देशाने मराठा समाजासाठी काम करत असलेल्या सर्व संघटना व सोशल काम करत असलेले ग्रुप उद्येजकता ग्रुप त्याला कनेक्ट करण्याचा सर्व समावेशक प्रयत्न असणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री सातारा जिह्याचेच आहेत. मागील युती सरकारमध्ये मराठा आरक्षण उपसमितीमध्येही त्यांचा समावेश होता. आताही मराठा आरक्षण उपसमितीमध्ये जिह्याचे पालकमंत्री यांचा ही समावेश आहे. त्यांनी हा या मेगा नोकरभरती प्रक्रीयेबाबत विचार केलेला नाही. त्यांनाही भविष्यात सर्वच ठिकाणी मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे, अशीही चर्चा यावेळी झाली.









