कोल्हापूर / दीपक जाधव :
केंद्राच्या इनेबल्ड पेमेंट सिस्टीम सर्व्हिसच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांत तीन लाख सत्त्यानव्व हजार चारशे चार नागरिकांना एकशे चौतीस कोटी पंच्याहत्तर लाख रुपये पोस्टमननी घरपोच केले आहेत. कोल्हापूर पोस्ट ऑफिस एईपीएस मध्ये देशात नंबर एक ठरले आहे. आधारकार्ड सर्व सरकारी निमसरकारी कामासाठी एक महत्वाचे दस्तावेज ठरले असून आता आधार कार्ड च्या माध्यमातून घरबसल्या पैसे देखील काढता येत आहेत.
कोल्हापूर जिल्हा मध्ये गेल्या पाच वर्षांत पावणेचार लाखाहून अधिक नागरिकांनी पोस्टमन कडून फेब्रुवारी अखेर एकशे चौतीस कोटी पंच्याहत्तर लाख रुपये घरबसल्या काढले आहेत. एईपीएस सेवेत कोल्हापूर पोस्ट विभाग देशात अव्वल ठरले. असुन कोरोना संसर्गाच्या काळात एक लाख आठ्ठावन्न हजार हुन अधिक नागरिकानी पंचेचाळीस कोटी बेचाळीस लाख रुपयाचा व्यवहार घरबसल्या केला आहे.
भारतीय डाक विभाग आता फक्त पत्र पाठविण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. पोस्ट बँकेचा लाभ सर्वसामान्यांसह विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, रोजगार हमी योजनेच्या मजुरांना होत आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेतील आधार संलग्न भुगतान सेवा (एईपीएस)मार्फत ग्रामीण भागातील खातेधारकांना बँकेतून, जेष्ठ नागरिकांना किवा एखाद्या आजारी नागरिकाला पैसे काढावयाचे असल्यास तालुक्याच्या ठिकाणी तसेच बँकेत जावे लागत होते. पोष्टाच्या या सेवेमुळे बँकच ग्राहकाच्या दारात आली असुन घरबसल्या सेवा मिळत आहे.
- असे झाले व्यवहार
वर्ष ग्राहक रक्कम
19-20 9,649. 3कोटी 38 लाख
20-21 1,58,539. 45 कोटी 42 लाख
21-22 97,704. 34 कोटी 92 लाख
22-23 64,218. 25 कोटी 48 लाख
23-24 37,486. 14 कोटी 84 लाख
24-25 29,808. 10कोटी 71 लाख
3,97,404. 134,75,000.
इनेबल्ड पेमेंट सिस्टीम अंतर्गत सेवेचा जिह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणावर लाभ घेत असुन या माध्यमातून नागरिकांनी एक मेसेज पोस्टमन व ग्रामीण डाक सेवक ना पाठवल्या नंतर आमचे पोस्टमन व ग्रामीण डाक सेवक घरी जाऊन नागरिकांना पैसे पोच करत आहेत. यामध्ये पोस्टमन व ग्रामीण डाक सेवक याचा मोलाचा वाटा आहे.
अनुराग निखारे. प्रवर डाक अधिक्षक, कोल्हापूर.








