प्रतिनिधी / बेळगाव
जायंट्सचे माजी अध्यक्ष,आरसीयुचे डॉ. विनोद गायकवाड यांच्या मातोश्री शांता गायकवाड यांचे आज पहाटे वयाच्या ८० व्या वर्षी मांजरी मुक्कामी निधन झाले. निधनानंतर लागलीच प्रथमपासूनच समाजसेवेत वाहून घेतलेल्या प्रा.डॉ गायकवाड यांनी जायंट्स आय फौंडेशनच्या मदन बामणे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर मदन बामणे यांनी शवावहिकेतून मृतदेह जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयात आणला. केएलई नेत्रपेढीच्या डॉ मिताली मंगोळी, डॉ स्वीकृती चक्रवर्ती आणि केएलई -रोटरी स्किन बँकेच्या डॉ सुहास गौडा,अश्विनी कंग्राळकर विक्रम सिंघ यानी नेत्रदान आणि त्वचादानाची प्रक्रिया पूर्ण केली. त्यांच्या नेत्रदानामुळे दोन अंध व्यक्तींना दृष्टी मिळाली.यानंतर शांता गायकवाड यांचा पवित्र देह वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत व्हावी म्हणून जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाला दान करण्यात आला.जायंट्स आय फौंडेशनच्या वतीने गायकवाड कुटुंबीयांचे आभार मानण्यात आले.









