कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या (Cannes Film Festival) वर्ल्ड प्रीमिअरच्या दोन आठवडे अगोदर बॉलीवूडचा (Bollywood) आघाडीचा दिग्दर्शक अनुराग कश्यपने ( Anurag kashyap ) आपल्या आगामी केनेडी (Kenedy) या चित्रपटाचे काही फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहेत. राहुल भट (Rahul Bhat) आणि सनी लिओनच्या (Sunny Leoni) यांची मुख्य भुमिका असलेल्या या चित्रपटाच्या पोस्टरने अनुरागच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Instagram वर या चित्रपटाचे कलाकार आणि आणि क्रू यांना टॅग करून त्याने “2 आठवडे बाकी आहेत! #Kennedy’s countdown to Cannes!” असे म्हटले आहे.
या फोटोमध्ये राहूल हा केनेडीच्या भुमिकेत आहे. पहिल्यामध्ये राहुल केनेडीच्या भूमिकेत आहेत. तो लाल लेदर सोफ्यावर बसला आहे, धूम्रपान करताना सफरचंद सोलत आहे. त्यानंतरची भूमिका सनी लिओनीची चार्ली या व्यक्तिरेखेची आहे. चेस लाउंजवर बसलेली असताना तिने काळी साडी नेसलेली असून हातात ड्रिंक धरून दुसऱ्याकडे पाहत असल्याचे दिसते. रेट्रो साडीत सनी लिओनी लक्ष वेधून घेत आहे.
कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 साठी ‘मिडनाईट स्क्रीनिंग’ कॅटेगरीमध्ये स्क्रीनिंगसाठी निवड झाल्यानंतर, अनुरागने आपल्या चाहत्यांना केनेडीच्या पहिल्या पोस्टरची झलक करून दिली. केनेडीच्या निमित्ताने या चित्रपटातील राहुल भट आणि सनी लिओन यांचा नवा लूक नुकताच कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या व्यासपीठावर दिसला आहे.
केनेडी हे निद्रानाश असलेल्या पोलीस अधिकाऱ्याची कथा आहे. भ्रष्ट व्यवस्थेसाठी काम करत असताना केनेडी मुक्ती शोधत आहे. यापुर्वीच्या केनेडीच्या पहिल्या पोस्टरमध्ये मोठ्या कॅनव्हासवर राहुल भट एक गुढ मुखवटा घातलेला दिसून येतो. सनी लिओनी दारासमोर उभी असलेली दिसून येते. राहुल भट आणि सनी लिओनीचा नवीन लूक चित्रपटातील सस्पेन्सबद्दल बरेच काही सांगताना दिसू शकतो. लांब केस आणि दाढीमुळे राहुल भट एका गुढ व्यक्तीरेखेत दिसत आहे.