बेळगाव : कित्तूर राणी चन्नम्मा यांच्या ऐतिहासिक विजयाला 200 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या नावाने टपाल तिकिटाचे अनावरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राणी चन्नम्मा यांचे कार्य देशभर पोहोचविण्याच्या केंद्र सरकारच्या या निर्णयाचे राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी स्वागत केले आहे. चन्नम्मा यांच्या विजयाला 200 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या नावाने पोस्ट तिकीट सुरू करावे, अशी मागणी काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी व इराण्णा कडाडी यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे केली होती. याची दखल घेत 23 ऑक्टोबर रोजी या तिकिटाचे अनावरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
Previous Articleवडगाव- जुने बेळगाव येथील तलावांचे काम अर्धवट स्थितीत
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









