सावंतवाडी –
माडखोल धरणाजवळ एक इलेक्ट्रिक दुचाकी आणि चप्पल आढळल्याने कोणीतरी बुडाल्याची शक्यता लक्षात घेऊन सावंतवाडी पोलिसांनी माडखोल धरण परिसरात धाव घेत बाबल आल्मेडा रेस्क्यू टीमच्या मदतीने धरणात शोध मोहीम सुरू केली आहे . सदर सापडलेली दुचाकी सावंतवाडी तालुक्यातील एका युवकाची असल्याचे समजतेय. आता रेस्क्यू टीमच्या मदतीने शोध मोहीम सुरू आहे. मात्र,दुपारी दोन वाजेपर्यंत धरणात कोणीही आढळले नाही अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.









