शिवसेना- ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज रविवारी असा दावा केला की, सरत्या वर्षी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला एक नवीन “रूप” मिळाले. जर 2023 मध्ये गांधीच्या नेतृत्वाचे रूप कायम राहिले, तर 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत देशात राजकीय बदल घडू शकतो. असे मत व्यक्त केले. शिवसेनेचे मुखपत्र सामना या दैनिकात रोकठोक या सदरात त्य़ांनी आपले मत व्यक्त केले.
आपल्या स्तंभात लिहीताना राऊत म्हणतात की, “राहुल गांधींची यात्रा यशस्वी होईल आणि त्यांचे उद्दिष्ट साध्य होईल अशी आशा आहे. गांधींनी 7 सप्टेंबर 2022 रोजी तामिळनाडूमधील कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रेला सुरुवात केली आणि ती या महिन्यात श्रीनगरमध्ये संपण्याची शक्यता आहे. 2022 या वर्षाने राहुल गांधींच्या नेतृत्वाला एक नवी चमक दिली आहे. 2023 मध्ये असेच राहिल्यास 2024 मध्ये आपण राजकीय बदल पाहू शकतो,” असे राऊत म्हणाले.
पुढे लिहीताना ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी द्वेष आणि फूट पाडण्याची बीजे पेरू नयेत. राम मंदिराचा मुद्दा निकाली निघाला आहे, त्यामुळे या विषयावर कोणतेही मत मागता येणार नाही.”
गेल्या महिन्यात अभिनेत्री तुनिषा शर्माचा मृत्यू आणि श्रद्धा वालकरची तिच्या प्रियकराने केलेली हत्या याचा संदर्भ देत, राऊत यांनी सांगितले की “ही लव्ह जिहादची प्रकरणे नाहीत तरीही कोणत्याही समाजाच्या किंवा धर्मातील कोणत्याही महिलेला अत्याचाराला सामोरे जावे लागू नये.’लव्ह जिहाद’चा नवा विषय कशाला काढला जात आहे.? ‘लव्ह जिहाद’चे हे हत्यार निवडणुका जिंकण्यासाठी आणि हिंदूंमध्ये भीती निर्माण करण्यासाठी वापरले जात आहे का?”
Previous Articleखारघरमध्ये एक कोटीचे ड्रग जप्त; क्राईम ब्रॅन्चची मोठी कारवाई
Next Article पाक, न्यूझीलंडचे लक्ष कसोटी मालिका विजयावर









