नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राजकीय आणि आर्थिकदृष्टय़ा अस्थिर असलेला पाकिस्तान आता पुन्हा लशकरी राजवटीच्या दिशेने वटचाल करु लागल्याचे दिसून येत आहे. जवळपास प्रत्येक आंतरराष्ट्रीय अभ्यासकाने ही शंका व्यक्त केली आहे. पाकिस्तानात असहय़ महागाईमुळे मोठय़ा प्रमाणात असंतोष असून या असंतोषाचे रुपांतर जनक्षोभात होण्याची शक्यता आहे. या स्थितीचे निमित्त करुन पाकिस्तातील लष्कर तेथील सत्ता आपल्या हाती घेण्याची दाट शक्यता आहे. अफगाणिस्तान या शेजारी राष्ट्राबरोबरचे पाकिस्तानचे संबंध रसातळाला गेले असून अफगाणिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले घडविण्याचे पाकचे प्रयत्न असल्याचा आरोप होत आहे. तसे झाल्यास अफगाणिस्तानही त्याचे प्रत्युत्तर त्याच मार्गाने दिल्याखेरीज राहणार नाही. ही स्थिती या क्षेत्रातील शांततेसाठी घातक ठरणार आहे, असा इशारा देण्यात आला आहे. अमेरिकेने हस्तक्षेप करण्याची मागणीही होत आहे.