ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Possibility of arrest of Imran Khan in case of foreign funds परदेशी निधी प्रकरणात पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI)चे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक होण्याची शक्यता आहे. ARY न्यूजच्या हवाल्याने ANI या वृत्तसंस्थेने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
परदेशी निधी प्रकरणात पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफच्या तरिक शफी, हमीद झमन आणि सैफ नाइझी या नेत्यांना शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आता इम्रान खान यांनाही अटक होण्याची शक्यता आहे. सेफुल्ला नाईझी यांनाही पाकिस्तानच्या तपास संस्थेने अटक केली आहे. त्यांच्यावर अधिकृत संकेतस्थळ चालविल्याचा तसेच त्यामाध्यमातून अनधिकृत कामे केल्याचा आरोप आहे.
अधिक वाचा : मान्सूनचा महाराष्ट्राला लवकरच अखेरचा सलाम