सांगली :
सांगली एमआयडीसी क्षेत्रातील अनेक कारखाने सध्या बंद आहेत. तेथे काही कुउद्योग सुरु असतील, तर त्यावर कारवाई करण्याचे आदेश देवू तसेच जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळावी, यासाठी येत्या सहा महिने ते वर्षाच्या आत मोठा उद्योग सुरू करण्यात येईल. यासंदर्भात उद्योजकांबरोबर चर्चाविमर्ष सुरू आहे. • उद्योग विभागातील अनेक अधिकारी परस्पर निर्णय घेतात. या विभागात काय अपेक्षा आहेत, याबाबतची विचारणा करणे आवश्यक आहे. याबद्दलची नाराजी मी प्रधान सचिवांकडे उघड केली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या कारभारावर नाराज असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी सांगलीतील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. यावेळी सांगलीतील कवलापूर विमानतळ व ड्रायपोर्टबाबतही सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, कवलापूर येथील विमानतळाच्या जागेचा सर्व्हे करण्याच्या सूचना प्राधिकरणाला देण्यात आलेल्या आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात खाल्यानंतरहरातीलठी अनेक बंद असलेल्या कारखान्यांची तपासणी करण्याच्या सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत.
यामध्ये काही दोषी किंवा आक्षेपार्ह आढळल्यास संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यावर बोलताना मनोज जरांगे यांनी संयम ठेवायला हवा. आरक्षणाबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांशी सुसंवाद साधला पाहिजे. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याबाबत कर्नाटक सरकारच्या हालचाली सुरू आहेत. या संदर्भात केंद्रीय मंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारने कोणताही आक्षेप घेतला नसल्याचे म्हणणे मांडले आहे. या संदर्भात मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहे. सांगली व कोल्हापूर या भागातील लोकांच्या भावना त्यांच्यापर्यंत मांडणार असल्याचेही उद्योगमंत्री सामंत
यांनी सांगितले. अभिनेते राहूल सोलापूरकर यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेले वक्तव्य चुकीचे आणि निषेधार्ह आहे. त्यांनी आता इतिहासावर बोलणे थांबवले पाहिजे.
शिवसेनेत येण्यासाठी सांगलीसह राज्यातील अनेकजण इच्छुक आहे. त्याबाबत लवकरच काही घडामोडी जनतेला पहावयास मिळतील. यावेळी जिल्हा प्रमुख आनंदराव पवार यांनी सांगलीतील कृष्णामाई महोत्सवात आयुक्तांकडून व पोलिस प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळत नसल्याचे सांगितले.
- सांगलीतील नशेबाजी रोखावी लागेल
जिल्ह्यात अवैधरित्या अंमली पदार्थाची विक्री सुरु आहे. ही बाब अतिशय गंभीर असून ही नशेबाजी रोखावी लागेल. यासाठी काही बंद असलेल्या कारखान्यांची तपासणी करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या असून, यात काही दोषी किंवा आक्षेपार्ह आढळल्यास संबंधितावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.








