रत्नागिरी :
पोलीस असल्याची बतावणी करुन आणखी एका महिलेची दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी नकली चेन कागदात बांधून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आह़े ही घटना मंगळवारी दुपारी 3.30 च्या सुमारास घडल़ी अशिता बळीराम म्हापुस्कर (80, ऱा हातखंबा नागपूर पेठ, ता. रत्नागिरी) असे या महिलेचे नाव आह़े शहरातील मांडवी येथेही मंगळवारी पोलीस असल्याचे सांगून एका महिलेचे दागिने लुटल्याचा प्रकार समोर आला होत़ा
अशिता म्हापुस्कर या 8 एप्रिल रोजी आपल्या नातीसह दुचाकीवरुन हातखंबा ते खेडशी अशा जात होत्य़ा दुपारी 3.30 च्या सुमारास पानवल येथे त्या आल्या असता दुचाकीस्वार संशयिताने त्यांना आपण पोलीस असल्याचे सांगून दुचाकीवरुन खाली उतरण्यास सांगितल़े तसेच पुढे चोऱ्या होत असून तुमच्याकडील दागिने काढून ठेवा, असे सांगितल़े यावेळी संशयिताने तक्रारदार यांच्या पर्समधील चेन कागदामध्ये बांधून ठेवण्यासाठी आपल्याकडे मागून घेतल़ी यावेळी आपल्याकडील नकली चेन कागदात बांधून महिलेची फसवणूक केली, अशी तक्रार ग्रामीण पोलिसात दाखल करण्यात आली आह़े त्यानुसार पोलिसांनी दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केल़ा








