वृत्तसंस्था/ फ्रँकफर्ट (जर्मनी)
पोर्तुगालने युरोपियन चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला असून तेथे त्यांची फ्रान्ससमवेत ब्लॉकबस्टर लढत होणार आहे. जागतिक फुटबॉलमध्ये 57 व्या क्रमांकावर असलेल्या स्लोव्हेनिया संघाविऊद्ध निर्धारित वेळेत सामना गोलशून्य बरोबरीत राहिल्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये 3-0 ने जिंकणे हे पोर्तुगालच्या प्रतिष्ठेला शोभण्यासारखे नव्हते.
39 वर्षीय क्रिस्तियान रोनाल्डो या सामन्यात उतरला तेव्हा एकही गोल त्याच्या खात्यावर नव्हता. युरोमध्ये गोल करणारा त्याला सर्वांत वयस्कर खेळाडू व्हायचे होते. तो क्षण पहिल्या अतिरिक्त वेळेत 105 व्या मिनिटाला आला. यावेळी पोर्तुगालला पेनल्टी किक देण्यात आली आणि रोनाल्डोचा हा गोल निर्णायक ठरू शकला असता. पण स्लोव्हेनियाचा गोलरक्षक जॅन ओब्लाकने डावीकडे झेपावत हा फटका निष्फळ ठरविला.
अतिरिक्त वेळही गोलशून्य बरोबरीत संपला आणि पेनल्टी शूटआऊट सुरू झाल्यावर स्लोव्हेनियाची पहिली किक पोर्तुगालचा गोलरक्षक डिओगो कॉस्ताने रोखली. त्यानंतर सुमारे 10,000 पोर्तुगाल चाहत्यांसमोर रोनाल्डोने पुढे येऊन फटका हाणताना चेंडू अगदी आदर्श पद्धतीने खाली ठेवला. कॉस्ताने जोसिप इलिसिच, ज्युरे बालकोवेक आणि बेंजामिन व्हर्बिक अशा स्लोव्हेनियाच्या तिन्ही किक रोखल्या, तर पोर्तुगालसाठी ब्रुनो फर्नांडिस आणि बर्नार्डो सिल्वा यांनीही गोल करून दोन किक बाकी असताना शूटआउट 3-0 ने संघाला जिंकून दिला. हॅम्बर्ग येथे शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीत पोर्तुगालचा सामना फ्रान्सशी होणार आहे.
रोनाल्डोच्या डोळ्यांत तरळले अश्रू, हुकली पेनल्टी
या सामन्यात पोर्तुगालचा स्टार खेळाडू क्रिस्तियान रोनाल्डोच्या डोळ्यांत अश्रू तरळल्याचे आणि त्याला चाहत्यांची जणू माफी मागताना पाहायला मिळाले. याचे कारण अधिक स्पर्धा इतिहास घडवण्याच्या संधी वाया घालविल्या गेल्या वा नाकारल्या गेल्या. रोनाल्डोची आई यावेळी स्टेडियममध्ये होती आणि जेव्हा त्याने पेनल्टी चुकवली त्यावेळी ती रडत असल्याचे टीव्हीवर दाखवण्यात आले. ‘कधी कधी पेनल्टीवर गोल करणे कठीण असते’, असे रोनाल्डोने पोर्तुगीज ब्रॉडकास्टर आरटीपीला सामन्यानंतर भावूक होऊन सांगितले. ‘मी माझ्या कारकिर्दीत 200 पेक्षा जास्त पेनल्टी हाणल्या आहेत. पण कधी कधी गोंधळ होतो.ठ