“देशात मोदी…महाराष्ट्रात शिंदे” या शिंदे गटाच्या जाहीरातीवर भाजपमधून नाराजीचे सूर तसेच विरोधकांकडून टिका होऊ लागल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले मत मांडले आहे. ही जाहीरात सरकारने दिलेली नाही असे म्हणत आम्ही आरोपाला आरोपाने उत्तर देणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच लोकप्रिय मुख्यमंत्री हे माझं एकट्याचं श्रेय नसून देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर पंतप्रधानांनी केलेल्या अर्थिक पाठबळामुळे शक्य झाले असल्याचेही ते म्हणाले.
शासन आपल्य़ा दारी या योजनेच्या शुभारंभासाठी कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आज वृत्तपत्रांमध्ये शिवसेनेच्या वतीने जाहिरात देण्यात आहे यावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खुलासा करताना कोणतीही जाहिरात राज्य सरकारने दिलेली नाही असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना ते म्हणाले, “लोकप्रिय मुख्यमंत्री हे माझं एकट्याचं श्रेय नाही..ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांचे श्रेय आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक पाठबळ अनेक योजनेच्या माध्यमातून दिले आहे. त्यामुळं आपण बंद पडलेल्या प्रकल्पांना चालना देतोय, मुंबईतील एक- एक प्रकल्प हजारो- करोडो लोकांच्या रोजगाराला चालना देणारे आहे.” असे ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “लोकांनी खऱ्या भाजप आणि युती सरकारला पसंती दिली आहे. जाहिरातीपेक्षा लोकांच्या मनातील भावना या माध्यमातून दिसून आल्या आहेत. आम्ही आमचं काम करत राहू विरोध आतापर्यंत आरोप करत राहीले आहेत. आरोपाला आरोपाने उत्तर देणार नाही. दुपटीने आम्ही काम करू, आमची विनंती आहे की खर चित्र जनतेसमोर आणा.” अशी विनंती त्यांनी माध्यमांना दिली आहे.








