वृत्तसंस्था / सिडनी
ऑस्ट्रेलियाच्या पुरूष फुटबॉल संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी 51 वर्षीय टोनी पोपोव्हीक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया फुटबॉल फेडरेशनच्या प्रवक्त्याने ही घोषणा सोमवारी केली.
2026 साली होणाऱ्या फिफाच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेपर्यंत ऑस्ट्रेलियन फुटबॉल संघाला पोपोव्हीक हे प्रमुख प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन करतील. यापूर्वी ऑस्ट्रेलियन फुटबॉल प्रशिक्षकपदाची जबाबदारी ग्रॅहॅम अर्नोल्ड यांच्याकडे सोपविण्यात आली होती. पण गेल्या आठवड्यात त्यांनी आपल्या प्रशिक्षकपदाचा त्याग केल्याने त्यांच्या जागी पोपोव्हीक यांची नवे प्रमुख प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.









