आणखी आठवडाभर रुग्णालयातच राहणार
वृत्तसंस्था/ लंडन
ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. पोप यांना दोन्ही फुफ्फुसांमध्ये न्यूमोनिया आणि श्वसनमार्गाच्या संसर्गाचा त्रास आहे. गेल्या एका आठवड्यापासून ते रोमच्या गेमेली रुग्णालयात दाखल आहेत. सध्या ते आजारातून पूर्णपणे बरे झालेले नसले तरी आता कोणताही धोका नाही, असे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी शनिवारी स्पष्ट केले. दोन दिवसांपूर्वीच 88 वर्षीय पोप यांची प्रकृती खूपच गंभीर असल्याची बातमी समोर आली होती. तसेच काही स्विस माध्यमांनी पोप यांच्या अंत्यसंस्काराची तालीम सुरू झाल्याचे वृत्तही दिले होते.









