वृत्तसंस्था/ व्हॅटिकन सिटी
प्रकृती अस्वास्थ्यामुळे इस्पितळात उपचार घेणाऱ्या पोप फ्रान्सिस यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. 30 मार्च रोजी पोप यांना श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोप फ्रान्सिस यांना अलीकडच्या काही दिवसात श्वासोच्छवासाची तक्रार होती. प्रकृती बिघडल्याने त्यांना जेमेली रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, असे व्हॅटिकनचे प्रवक्ते मॅटेओ ब्रुनी यांनी सांगितले. उपचाराअंती घरी परतण्यापूर्वी त्यांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबत पिझ्झा खाल्ल्याचे आणि बालरोग वॉर्डमध्ये एका मुलाला ख्रिश्चन धर्माची दीक्षा दिली.
अलीकडच्या काही दिवसात पोप फ्रान्सिस यांना श्वासोच्छवासाची समस्या जाणवत आहे. गेल्या दोन दिवसात इस्पितळात त्यांच्या विविध चाचण्या करण्यात आल्या असून येत्या काही दिवसांत योग्य रुग्णालयात वैद्यकीय उपचार केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.









