वृत्तसंस्था/निंग्बो (चीन)
येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारतीय नेमबाजांची पिछेहाट गुरूवारी चालुच राहिली आहे. दरम्यान भारताचे नेमबाज दिव्यांश सिंग पनवर, उमामहेश मदिनेनी आणि राही सरनोबत यांचे आव्हान पात्र फेरीतच समाप्त झाले. 2022 साली कैरोमध्ये झालेल्या विश्व नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत पुरूषांच्या 10 मी. एअर रायफल नेमबाजीत भारताच्या रुद्रांक्ष पाटीलनंतर दुसऱ्या स्थानावर राहिलेला इटलीचा नेमबाज डॅनिलो सोलाझो याने नवा विश्वविक्रम नोंदविताना 255.0 गुण नोंदवित सुवर्णपदक मिळविले. शेंग लिहाओने रौप्य तर कोरियाच्या हेजूनने कांस्यपदक घेतले. भारताच्या दिव्यांश सिंग पनवर याचे आव्हान पात्र फेरीतच समाप्त झाले. महिलांच्या विभागात राही सरनोबतकडून निराशा झाली. रॅपिड फायर पिस्तुल नेमबाजीत तिने 295 गुण नोंदविले. पण ती पुढील फेरीसाठी पात्र ठरु शकली नाही.









