Poor condition of the road leading to the ancient Rameshwar temple
वाहनचालक, स्थानिक ग्रामस्थ, पर्यटकांना सहन करावा लागतो मनस्ताप
राजकीय पुढाऱ्यांमध्ये रस्त्याबाबत मात्र उदासीनता
आचरा देऊळवाडी रामेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची पूर्णता दुर्दशा झाली आहे. डांबरी रस्ता पूर्णता नष्ट झाला आहे. वाहतूक करताना खाजगी ठेकेदाराच्या कामगारांच्या निष्काळजीपणा रस्त्यावर पडलेली खडी, रेती पडलेली अपघातास निमंत्रण ठरत आहे. वाहनचालक, स्थानिक ग्रामस्थ, पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे यामुळे वाहनचालकांमधून संताप व्यक्त केला जातआहे. प्राचीन मंदिराकडे जाणारा रस्ता असूनही रस्ता मार्गी लावण्यात राजकीय पुढाऱ्यांमध्ये मात्र उदासीनता दिसत असल्याने ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत. दुर्दशा झालेल्या रस्त्याची तातडीने डांबरीकरण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा आचरा देवूळवाडी, व स्थानिक ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.
आचरा / प्रतिनिधी









