न्हावेली / वार्ताहर
Pooja Makhar made from biscuits at Kondure!
सावंतवाडी तालुक्यातील कोंडूरे येथील प्रसिद्ध श्री राष्ट्रोळी देवस्थान,वरची वाडी येथे सालाबाद प्रमाणे श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते.दर वर्षी प्रमाणे मंडळाचे कार्यकर्ते या पूजेच्या निमित्ताने वेगवेगळी नावीन्यपूर्ण “मखर” बांधत असतात. मात्र ह्या वर्षी शुक्रवार दिनांक १२ मे रोजी झालेल्या पुजेनीमित्त या मंडळातील युवक अंगार मुळीक व त्याच्या साथीदारांनी आपल्यातील कलेचा पुरेपूर वापर करून चक्क खाण्याच्या बिस्किटांचा वापर करून मखर तयार केले.सध्या हे मखर सगळीकडे मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.









