अॅक्शन थ्रिलर धाटणीचा चित्रपट
दक्षिणेतील आघाडीची अभिनेत्री पूजा हेगडे लवकरच एका थ्रिलर धाटणीच्या हिंदी चित्रपटात दिसून येणार आहे. पूजा हेगडेसाठी हा चित्रपट अत्यंत खास ठरू शकतो. झी स्टुडिओज आणि रॉय कपूर फिल्म्सने पूजा हेगडे लवकरच शाहिद कपूरसोबत दिसून येणार असल्याची घोषणा केली आहे. निर्मात्यांनी शेअर केलेल्या छायाचित्रांमध्ये पूजा हेगडे ही शाहिद कपूरसोबत दिसून येत आहे.
पूजा हेगडे आमच्यासोबत जोडली गेल्याने आमचा रोमांचक चित्रपट अधिकच रोमांचक ठरणार असल्याचे निर्मात्यांनी म्हटले आहे. याचबरोबर पूजा हेगडे हिने देखील यासंबंधी सोशल मीडियावर पोसट केली आहे.
शाहिद आणि पूजा यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन रेशन अॅन्ड्य्रूज करणार आहेत. पूजा आणि शाहिदची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसून येणार आहे. पूजा हेगडे ही यापूर्वी सलमान खानचा चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात दिसून आली होती. पूजा हिने दक्षिणेत स्वत:चे स्थान निर्माण केले असले तरीही बॉलिवूडमध्ये तिला फारसे यश मिळविता आलेले नाही. याचमुळे पूजाकरता शाहिदसोबतचा चित्रपट अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. शाहिद हा बॉलिवूडमधील प्रस्थापित कलाकार असून त्याची मोठी फॅन फॉलोइंग देखील आहे.









