स्थानिक 20 शालेय संघांचा समावेश : रॉयस्टीन गोम्स स्पर्धेच्या धर्तीवर होणार स्पर्धा
बेळगाव : सेंटपॉल्स स्कूलची माजी विद्यार्थी संघटना पोलाईडस ऑफ बेलगाम वर्ल्ड वाईड व सेंटपॉल्स हायस्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने पोलाईडस चषक 14 वर्षाखालील आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेला बुधवार दि. 16 जुलैपासून सेंटपॉल्सच्या टर्फ मैदानावर प्रारंभ होणार आहे. पोलाईडस विद्यार्थी संघटनेकडून रॉयस्टीन गोम्सच्या धर्तीवरती पोलाईडस चषक 14 वर्षाखालील आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ होणार असून या स्पर्धेत स्थानिक 20 संघानी सहभाग घेतला आहे. त्यामध्ये जैन हेरीटेज, केएलएस, कनक मेमोरियल, संजय घोडावत स्कूल, सेंटपॉल्स, केएलई इंटरनॅशनल, एमव्ही. हेरवाडकर, शेख सेंट्रल, केएलएस पब्लिक, मराठी विद्यानिकेतन, ज्योती सेंट्रल, गुडशेफड, कॅन्टोन्मेंट, गजाननराव भातकांडे, सेंट झेवियर्स, लव्हडेल सेंट्रल, कर्नाटका दैवज्ञ, अंगडी इंटरनॅशनल, भरतेश सेंट्रल, इंडस अल्तम या संघाचा समावेश आहे. बुधवारी दुपारी 3 वा. स्पर्धेचे उद्घाटन होणार असून यावेळी स्पर्धा पुरस्कर्ते डॉ. गुरू मोदगी, दोड्डण्णावर ब्रदर्स, सेंटपॉल्सचे प्राचार्य फादर सायमंड फर्नांडीस एस. जे., स्पर्धा कमिटीचे चेअरमन अमित पाटील, पोलाईडसचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनाचा सामना केएलएस वि. जैन हेरिटेज यांच्यात 3.30 वा. दुसरा सामना भरतेश सेंट्रल वि. इंडस अल्तम यांच्यात 4.30 वा. खेळविण्यात येणार आहे.









