सांगली : प्रतिनिधी
सांगली जिल्हातील खानापूर तालुक्यातील हिंगणगादे या गावाने सर्व पक्षाच्या राजकीय पुढाऱ्यांना मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत गावबंदी जाहीर केली आहे. मराठा आरक्षणासाठी लढा उभा करणाऱ्या मनोज जरंगे पाटील यांनी हा प्रश्न हाती घेतल्यानंतर अशा प्रकारचा निर्णय घेणारे सांगली जिल्ह्यातील हे पहिले गाव ठरले आहे.
नक्की पहा VIDEO >>> प्रत्येक वेळी मी…मी…म्हणणाऱ्याला कोल्हापूरची जनता धडा शिकवेल- राजेश क्षीरसागर
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे- पाटील यांनी मागील काही दिवसापुर्वी आमरण उपोषण केले होते. त्यानंतर मनोज जरांगे यांनी राज्यभरात मराठा आरक्षणासाठी दौरे सुरु केले आहेत. मनोज जरांगे यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला उत्स्फुर्त प्रतिसाद देताना अनेक गावांनी मराठा आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी जाहीर करून गावात येण्यास मज्जाव केला आहे. अशा प्रकारचा निर्णय घेणारे हिंगणगादे हे सांगली जिल्ह्यातील पहिलेच गाव ठऱले आहे. गावातील प्रमुख चौकात अशा आशयाचे फ्लेक्स लावून ग्रामस्थांनी सर्व पक्षीय पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे. यापूर्वी सांगली जिल्ह्यातीलच तिसंगी या गावाने देखील असा निर्णय घेतला होता. ज्याची दखल ‘तरुण भारत’ ने सर्वात आधी घेतली होती.