सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी कोलगाव मध्ये गांजा पार्टी झाली. त्या पार्टीमधील दोघा युवकांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले. असे हे अमली पदार्थाची गांजा पार्टी प्रकार तरुणाईला उध्वस्त करत आहे. पोलीस यंत्रणेने ही पार्टी उधळून लावल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. मात्र अशा या प्रकारां विरोधात सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन चळवळ उभारणे गरजेचे आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते राकेश नेवगी यांनी स्पष्ट केले. श्री नेवगी पुढे म्हणाले खरंतर सावंतवाडी शहरालगत अशा अमली पदार्थ ,गांजा चरसच्या पार्ट्या होत असतात आहेत. हे अत्यंत सुसंस्कृत शहराला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला भूषणावह नाही. अशा या पार्ट्या घडवणाऱ्या आणि त्याची तस्करी करणाऱ्या रॅकेटवर पोलिसांनी धडक कारवाई करावी. आणि जास्तीत जास्त आरोपींना शिक्षा व्हावी . अशा पार्ट्या करणारे आणि यामागे कोण आहेत याचा सखोल तपास करून याच्या मुळापर्यंत जाणे आवश्यक आहे. हे फॅड गावागावापर्यंत जाण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे आता सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन अशा या प्रवृत्ती विरोधात आवाज उठवणे गरजेचे आहे. पोलीस यंत्रणेने या प्रकरणाचा सखोल तपास करून याच्या मुळापर्यंत जाऊन या मागचा सूत्रधार शोधावा. आणि त्याच्यावर कठोर कारवाई करावी. अशा या अमली पदार्थ व चरस ,गांजा पार्टी शहरालगतच्या गावात दिवसाढवळ्या जर होत असतील तर त्या विरोधात सर्व जनतेने आणि सर्व राजकीय, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन यावर काहीतरी तोडगा काढायलाच हवा असे त्यांनी स्पष्ट केले.









