राष्ट्रवादी काँग्रेससोबत आमची राजकिय दोस्ती असून ते आमच्या बरोबर विचार करूनच आले आहेत. तसेच भाजप बेईमानी नसून आमच्या सोबत येणाऱ्यांना आपण सोबत घेऊनच जाणार असल्याचे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. तसेच काही नेते आता जन्माला आले आहेत पण मी अचानक जन्माला आलेला नेता नसल्याचा टोला देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. ते आज मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.
आपल्या भाषणात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले कि, “राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर आमची राजकिय दोस्ती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार विचार करूनच आमच्याबरोबर आले आहेत. आमचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत. पण काँग्रेसला आम्ही बरोबर घेणार नाही. तसेच एमआयएम, मुस्लिम लीग यांना सोबत घेणार नाही. भाजप बेईमानी नसून जे आमच्या बरोबर आले आहेत त्यांची आपल्याला काळजी घेतली पाहीजे” असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, “2019 मध्ये ठाकरेंनी पाठीत खंजिर खुपसला. 2019 ची उत्तर 2023 मध्ये मिळाली तर 2023 ची उत्तर 2026 पर्यंत मिळतील. मी संजय राऊत नाही माझ्या विधानांचा वेगळा अर्थ काढू नका. आजकाल अनेक नेते अचानक जन्माला आले आहेत पण मी काय अचानक जन्माला आलेला नेता नाही.” असेही ते म्हणाले.
शेवटी त्यांनी “मोदींच्या हाती पुन्हा देश दिल्यास देशाचा आणखी विकासच होणार. नेता मजबूत असेल तर देश टिकतो. मान्य नागरिकांचा विश्वास भाजपवर असून पहीला देश मग पक्ष त्यानंतर आपण असा विचार केला पाहीजे. महिला मंत्री नसेल तर मंत्रीमंडळाचा विस्तार करणार नाही.” असेही त्यांनी म्हटले आहे.