ऑनलाईन टीम/तरुण भारत
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Britain Prime Minister Boris Johnson) यांच्या कंजर्वेटिव पक्षात बंडखोरी झाली असून आतापर्यंत ४ केंद्रीय मंत्र्यासह ४० जणांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. यामुळे बोरिस जॉन्सन यांचे सरकार कोसळले असून त्यांनीही आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्याचे ठरविले आहे.
दरम्यान, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आज राजीनामा देऊ शकतात. मात्र, राजीनामा देण्यापूर्वी ते देशाला संबोधित करणार आहेत. अशी माहिती आहे की जॉन्सन आज रात्री राष्ट्राला संबोधित करताना राजीनामा देण्याची घोषणा करू शकतात. तथापि, डाउनिंग स्ट्रीटच्या निवेदनात म्हटले आहे की नवीन नेता निवडून येईपर्यंत बोरिस जॉनसन पंतप्रधान राहतील.
बोरिस जॉन्सन सरकारमध्ये अनेक दिवसांपासून अंतर्गत वाद सुरू होता. अनेक नेते बोरिस यांच्यावर नाराज होते. यामुळे पक्षात बंडाचे वारे वाहत असल्याची बोरिस यांनाही कल्पना होती. मात्र अचानक अर्थमंत्री ऋषि सुनक (Rishi Sunak) आणि आरोग्यमंत्री साजिद जाविद (Sajid (Jawid) यांनी ५ जुलैला आपल्या पदाचा राजीनामा दिला. बोरिस जॉन्सन यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊनच आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे या दोघांनी सांगितले होते. तसेच जाता जाता बोरिस त्यांच्या नेतृत्वावरच या दोघांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
हे ही वाचा : ईडीची Vivo वर करडी नजर; छापेमारीनंतर डायरेक्टर देशातून फरार
वरिष्ठ मंत्र्यांनी पद सोडण्याचा दिला होता सल्ला
पंतप्रधान जॉन्सन यांच्या संकटात भर घालत, त्यांच्या सरकारमधील वरिष्ठ मंत्र्यांनी बुधवारी संध्याकाळी १०, डाउनिंग स्ट्रीट येथील पंतप्रधानांच्या निवासस्थानी गेले आणि त्यांना पंतप्रधान पद सोडण्यास सांगितले. विशेष म्हणजे त्यांच्या कट्टर समर्थक समजल्या जाणाऱ्या गृहमंत्री प्रीती पटेल यांचाही या मंत्र्यांमध्ये समावेश होता. जॉन्सन मंत्र्यांवर दबाव आणण्यासाठी सर्वांना वेगवेगळे भेटले.
बोरिस यांच्याविरोधात बंड होण्याची ही आहेत कारणे
या संपूर्ण बंडाळीमागे सध्या एकाच व्यकतीच्या नावाची चर्चा आहे. ती व्यक्ती आहे क्रिस पिंचर. क्रिस पिंचरवर सेक्स स्कॅडलचा आरोप आहे. पण तरीही यावर्षी फेब्रुवारी महिन्यात जॉन्सन यांनी क्रिस पिंचरची उप प्रतोद म्हणून नियुक्ती केली. ज्यास पक्षातील सगळ्यांचाच विरोध होता.
३० जून रोजी ब्रिटनच्या ‘द सन’ या वृतपत्रात एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यात क्रिस पिंचरने लंडनच्या एका कल्बमध्ये दोन पुरुषांबरोबर अश्लिल कृत्य केल्याचे आरोप करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते . त्यानंतर पिंचर यांना आपल्या उप प्रतोदपदाचा राजीनामा द्यावा लागला. पिंचर यांच्यावर याआधीही अनेकवेळा लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप करण्यात आले आहे.
पण त्यानंतर बोरिस यांच्या पक्षातीलच नेत्यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले. पिंचरवरील सगळ्या आरोपांची माहिती बोरिस यांना होती. पण त्यांनी त्याच्याविरोधात कधीही कसलीही कारवाई केली नाही.
हे ही वाचा : ठाण्यात उध्दव ठाकरेंना धक्का; 66 नगरसेवक शिंदे गटात
दरम्यान, बोरिस यांच्या पक्षात राजीनामा सत्र सुरू झाले. एकापाठोपाठ एक नेते त्यांना सोडून जाऊ लागले. त्यांच्याच पक्षातील लोक त्यांच्याविरोधात आग ओकत होते. बोरिस हे जगातील एकमेव असे पंतप्रधान आहेत ज्यांच्यावर उच्च पदावर असूनही नियम तोडल्याचा आरोप आहे.
दरम्यान ४० मंत्री सोडून गेल्याने बोरिस यांच्यावर राजीनामा देण्याचा दबाव वाढला होता. विरोधकांबरोबरच त्यांच्याच पक्षातील कार्यकरते त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. त्यामुळे बोरिस ज़ॉन्सन यांना आज राजीनामा द्यावा लागला.
कोरोना काळात १९ जून २०२० रोजी बोरिस यांचा वाढदिवस होता. यामुळे कोरोना प्रॉटोकॉलप्रमाणे जॉन्सन यांना दोनच व्यक्तींना घरी बोलावयाचे होते. पण बोरिस यांनी नियम धाब्यावर बसवत घरात जंगी पार्टी दिली. यापार्टीत ३० जण सामील होते. बोरिस हे त्यांच्या रंगेल आणि हजरजबाबी स्वभावासाठी ओळखले जातात.
हे ही वाचा : पक्ष नेतृत्वाला चुकीचे सल्ले देणाऱ्यांनीच सेनेचं नुकसान केलं- केसरकर