तीन पोलीस कर्मचारी जखमी
वृत्तसंस्था/ बारामुल्ला
जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथे माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांचे एस्कॉर्ट वाहन रस्ते अपघाताचे बळी ठरले आहे. मेहबूबा मुफ्ती यांच्या पथकाचे वाहन रस्त्यावरून घसरल्याने तीन पोलीस जखमी झाल्याचे सांगण्यात आले. उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिह्यातील ब्लॉक रोहमा येथील हादिपोरा गावात हा अपघात झाला. सुरक्षा मोहिमेदरम्यान बोलेरो एस्कॉर्ट वाहन नियंत्रण गमावून रस्त्यावरून घसरल्यामुळे हेड कॉन्स्टेबल फिरदौस अहमद, सिलेक्शन ग्रेड कॉन्स्टेबल मोहम्मद अयाज आणि सिलेक्शन ग्रेड कॉन्स्टेबल निसार अहमद हे तीन पोलीस जखमी झाले. जखमी पोलिसांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.









