उज्जैन :
मध्यप्रदेशात महाकालाची नागरी उज्जैनमध्ये क्षिप्रा नदीचे रौद्र रुप दिसून येत आहे. शनिवारी रात्री पोलिसांचे एक वाहन या नदीपात्रात कोसळले आहे. या वाहनातून पोलीस स्थानक प्रभारी समवेत तीन पोलीस प्रवास करत होते. स्थानक प्रभाऱ्यासह आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह हाती लागला आहे. तर अन्य दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. क्षिप्रा नदीच्या मोठ्या पूलावरून जात असताना वाहन अचानक नदीत कोसळले. घटनेची माहिती मिळताच बचावपथक त्वरित तेथे दाखल झाले. पोलीस कर्मचाऱ्यांना वाचविण्यासाठी मोहीम सुरू आहे, तर 2 पोलीस कर्मचाऱ्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. संबंधित वाहनातून पोलीस अधिकारी अशोक शर्मा, उपनिरीक्षक मदनलाल निनामा आणि महिला पोलीस कर्मचारी आरती पाल प्रवास करत होते. संबंधित पोलीस कर्मचारी हे एका बेपत्ता महिलेचा शोध घेण्यासाठी स्थानकातून बाहेर पडले होते.









