म. ए. समितीवर बंदीची केली मागणी
बेळगाव : म. ए. समितीवर बंदी घालावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालण्यासाठी जाणाऱ्या माजी आमदार वाटाळ नागराज यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. समितीवर गरळ ओकण्यासाठी वाटाळ यांनी आपली वटवट सुरूच ठेवली आहे. गुरुवारी सायंकाळी 5 च्या सुमारास दहा ते पंधरा कार्यकर्त्यांसह वाटाळ नागराज राणी चन्नम्मा चौकात दाखल झाले. थोडावेळ निदर्शने करून जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालणार असल्याचे सांगत ते पुढे निघाले. गुन्हे तपास विभागाचे एसीपी सदाशिव कट्टीमनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी वाटाळ व त्यांच्या सहकाऱ्यांना अडवून ताब्यात घेतले.









