एका फोनकालच्या माध्यमातून सार्वजनिक समस्यां निवारण करीता बेळगाव जिल्हा पोलीस वरिष्ठाधिकाऱ्याच्या वतीने उद्या २६ नोव्हेंबर रोजी फोन-इन् कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ११ ते दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान हा फोन-इन् कार्यक्रम चालणार आहे. जनता जिथे असेल तिथूनच पोलीस वरिष्ठाधिकाऱ्याना फोनच्या माध्यमातून आपली समस्या मांडून निराकरण करून घेऊ शकता. या साठी ०८३१-२४०५२२६ या क्रमांकावर कॉल करू शकतात .









