कृषीमंत्री रवी नाईक यांची पोलिसांना सूचना
फोंडा : सरकारी नोकरीचे आमिष दाखवून कोटी रूपयांना गंडा घालणाऱ्या ठकसेनाच्या मुसक्या आवळून पोलिसांनी चोख भूमिका बजावलेली आहे. या प्रकरणातून कोणलाही गय केली जाणार नाही. ठकसेन महिलांच्या कृत्यात अडकलेले गॉडफादर व गॉडमदरही यातून सुटणार याची दक्षता पोलिसांनी घ्यावी, असे आवाहन कृषीमंत्री रवी नाईक यांनी केले. फसवणूक झालेल्यानी नजीकच्या पोलिसस्थानकात तक्रार नोंदविण्याची सूचना मुख्ममंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यापुर्वीच दिली आहे. पोलिस जॉब स्कॅम प्रकरणात तीव्र गतीने तपास करीत आहेत. सरकारनेही पोलिसांना तपासकामात बऱ्यापैकी स्वातंत्र्य दिलेले आहे. त्यामुळे मुख्य सूत्रधारही आज, नाहीतर उद्या नक्कीच गजाआड होणार आहे, असा विश्वासही मंत्री नाईक यांनी व्यक्त केला आहे.









