प्रतिनिधी /म्हापसा
नास्नोळा बार्देश येथील नागरिक दिगंबर यशवंत धोंड (49) यांनी मंगळवारी दुपारी मयडे येथून बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांचे पुतणे दत्तराज धोंड यांनी म्हापसा पोलीस स्थानकात दिली आहे.
दु. 11.30 वाजण्याच्या दरम्यान स्कूटरने मयडे येथे घरी जात असताना त्यांनी पुलाच्या बाजूला रस्त्यावर आपली स्कूटर पार्क करून आपला शर्ट, पाकीट, चप्पल वर ठेवून पाण्यात उडी घेतल्याचा संशय आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक निनाद देऊळकर, उपनिरीक्षक पाटील, अग्निशमन दल यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. रात्री उशीरापर्यंत धोंडचा शोधकार्य सुरू होता. म्हापसा पोलीस व अग्निशमन दलाचे जवान शोध घेत आहे.









