प्रतिनिधी, रत्नागिरी
शहरातील मुरूगवाडा येथे अवैधरित्या चालणाऱ्या तीनपत्ती जुगारावर शहर पोलिसांनी धाड टाकली. बुधवारी रात्री 2 च्या सुमारास अत्यंत गोपनीयरित्या पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. यावेळी जुगार खेळणाऱ्या 13
जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याकडून 44 हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मुरूगवाडा येथे अवैधरित्या तीनपत्ती जुगार खेळवला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शहर पोलिसांकडून धाड टाकण्यासाठी पथके तयार करण्यात आली होती. बुधवारी रात्रीच्या सुमारास पोलिसांकडून जुगार चालत असल्याची खात्री करण्यासाठी सामान्य वेशातील पोलीस पाठवण्यात आला होता. जुगार चालवला जात असल्याची माहिती खात्री होताच शहर पोलिसांकडून अचानक छाड टाकण्यात आली.
अचानक पडलेल्या धाडीमुळे जुगाराच्या या अड्ड्यावर गोंधळ उडाला. दरम्यान पोलिसांनी चार बाजूंनी फौजफाटा लावल्याने सर्व संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून पोलिसांनी एकूण 44 हजार रूपयांचा मुद्देमाल
जप्त केला. यामध्ये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य याचा समावेश आह़े या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक अमोल भोसले यांनी तकार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी 13 संशयितांविरूद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









