इचलकरंजी ,प्रतिनिधी
शहरातील नदीवेस नाका परिसरात सह्यादी कला, क्रिडा व सांस्कृतिक मंडळाच्या नावाखाली सुरु असलेल्या जुगार अड्यावर पोलिसांनी शनिवारी पहाटे छापा टाकला. या छाप्यात अड्डा मालक आणि माजी नगरसेविकेचा पती सदानंद मारुती दळवाई, त्यांचा भाऊ दत्तात्रय दळवाई (दोघे रा. गांधी कॅम्प, इचलकरंजी) यांच्यासह ३७ जणांना पकडले. त्याच्याकडून २ लाख ५९ हजार ३६० रुपयांच्या रोकडीसह ३० मोबाईल हॅण्डसेट २५ दुचाकी आणि जुगाराचे साहित्य असा २० लाख २२ हजार ३४४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत इचलकरंजी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती कोल्हापूर स्थानिक-गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली.
सदानंद दळवाई यांच्या जुगार अड्यावर कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी पहाटेच्या सुमारास कारवाई करीत, २० लाख २२ हजार ३४४ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाई कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे,पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे,पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे,पोलीस अंमलदार हरीष पाटील,सुनिल कवळेकर,विलास किरोळकर,प्रकाश पाटील,किरण शिंदे,अनिल पास्ते,प्रितम मिठारी,महेश गवळी,विनायक चौगुले,कृष्णात पिंगळे अमर आडुळकर,राजेश राठोड़ युबराज पाटील,सागर चौगले,राजेंद्र वरंडेकर यांचा समावेश होता.









