जलद कृती दल, होयसळ, शक्ती पेट्रोलिंग वाहनांचाही सहभाग
बेळगाव : श्री विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर व परिसरात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित ठेवण्यासाठी बुधवारी सायंकाळी पोलिसांनी जलद कृती दल, होयसळ, शक्ती पेट्रोलिंग वाहनासह पथसंचलन केले. केपीटीसीएल भवनपासून पथसंचलनाला सुरुवात झाली. वाय जंक्शन, चन्नम्मा सर्कल, शनिवार खूट, कांबळी खूट, हुतात्मा चौक, धर्मवीर संभाजी चौक, टिळक चौक, हेमू कलानी चौक, शनिमंदिर, कपिलेश्वर उड्डाणपूल, बँक ऑफ इंडिया सर्कल शहापूर, नाथ पै सर्कल, वडगाव रोड, विष्णू गल्ली, बसवेश्वर सर्कल, वाडा कंपाऊंड, धर्मवीर संभाजी चौक अनगोळ, अनगोळ नाका, आरपीडी क्रॉस, गोवावेस, गोगटे सर्कल, ग्लोब सर्कल, मंगसुळी खूट, धर्मवीर संभाजी चौक, चन्नम्मा सर्कल, वाय जंक्शन, सदाशिवनगर, आझमनगर मार्गे शाहूनगरला जाऊन पथसंचलनाची सांगता झाली. या पथसंचलनात वाहनांचाही समावेश होता.









