बेळगाव : शहरातील खंजर गल्ली, जालगार गल्ली, खडेबाजार, चव्हाट गल्ली आदी गल्ल्यांतून मार्केटचे साहाय्यक पोलीस आयुक्त संतोष सत्यनाईक त्यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी मंगळवार दि. 28 रोजी सायंकाळी फेरफटका मारला. गुन्हेगारांना इशारा देण्यासाठी पोलिसांकडून हा फेरफटका मारण्यात आल्याची माहिती सूत्राकडून समजली. गेल्या काही दिवसांपासून शहर आणि उपनगरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे मंगळवारी सायंकाळी मार्केटचे एसीपी संतोष सत्यनाईक यांच्या उपस्थितीत पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी शहरातील प्रमुख गल्ल्यांमध्ये फेरफटका मारला.
आज सुवर्णकारांची बैठक
शहरासह मुख्यबाजारपेठेतील सुवर्णकारांची बुधवार दि. 29 रोजी पोलीस आयुक्तालयात दुपारी 12 वाजता बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत सुवर्णकारांना पोलीस खात्याकडून काही महत्त्वाच्या सूचना केल्या जाणार असल्याने सदर बैठकीला सर्व सुवर्णकारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.









