वार्ताहर /जांबोटी
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे, यासाठी पोलीस खात्याच्यावतीने शुक्रवारी जांबोटी येथे सशस्त्र सेना दलाच्या दोन तुकड्यांनी पथसंचलन केले. या संचलनामध्ये खानापूर पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या 50 पोलीस प्रशिक्षणार्थी तुकडीचाही समावेश होता. हे पथसंचलन खानापूरचे पोलीस निरीक्षक राठोड तसेच जांबोटी आऊट पोस्टचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ए. एस. बडीगेर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. जांबोटी बसस्थानक रामापूरपेठ-राजवाडा तसेच गावातील विविध भागांमध्ये पोलिसांनी पथसंचलनाद्वारे नागरिकांनी निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे, असे आवाहन केले.









