कोल्हापूर :
देशातील युद्धजन्य परिस्थतीचा तणाव निवळला असला तरी, खबरदारीच्या उपाययोजना म्हणून जिह्यातील पोलीस अधीकारी आणी कर्मचाऱ्यांच्या अर्जित आणि किरकोळ रजा रद्द करण्यात आल्या आहेत. सुट्यांवर गेलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ पोलीस स्टेशनला हजर राहण्याच्या सुचना प्रभारी पोलीस अधिक्षक निकेश खाटमोडे यांनी दिल्या आहेत.
भारत आणि पाकिस्तान दरम्यान सुरु असलेल्या युद्ध परिस्थीतीचा तणाव सध्या निवळला आहे. दोनही देशांकडून शस्त्र संधी लागू करण्यात आली आहे. मात्र तरीही राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी राज्य सरकारने आपतकालीन सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्याच्या सुचना दिल्या आहेत. राज्य शासनाने याबाबतच्या सुचना राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यानुसार पोलीस प्रशासनाने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.
- साप्ताहिक सुट्टी आणि आजारी रजा
पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केवळ आजारी आणि साप्ताहिक सुट्या लागू आहेत. त्यांच्या अर्जित आणि किरकोळ रजा बंद करण्यात आल्या आहेत. आपतकालीन सेवेतील सर्वच विभागांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.








