कट्टा / वार्ताहर
Police officer Pramod Parab passed away
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस खात्यात सध्या कार्यरत असलेले मालवण तालुक्यातील वराड कावळेवाडी येथील रहिवासी प्रमोद सुर्यकांत परब वय 54 यांचे मुंबई येथे अल्प आजाराने उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, भाऊ, भावजय, बहिणी, भावोजी, भाचे असा मोठा परिवार आहे. सेवाभावी , कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी म्हणून त्यांची ओळख होती. समाजात परोपकारी व्यक्ती म्हणून ते परिचित होते. त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तेथील स्थानिक स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग पोलीस खात्याचे अधिकारी, कर्मचारी, सामाजिक क्षेत्रातील मंडळी यांनी उपस्थित राहून परब यांना श्रद्धांजली वाहिली.









