कॉन्स्टेबल-होमगार्डसह 3 जणांचा मृत्यू
वृत्तसंस्था/ चंदीगड
चंदीगडमधील झिरकपूर सीमेवर शुक्रवारी सकाळी एका चेकपोस्टवर भरधाव कारने पोलीस कर्मचाऱ्यांसह एका नागरिकाला चिरडले. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. गाडीचा वेग जास्त असल्यामुळे तिघेही सुरक्षेसाठी लावलेल्या काटेरी तारेमध्ये अडकले. त्यांना बाहेर काढण्यासाठी मदत व बचाव पथकाला प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागली. मृतांमध्ये कॉन्स्टेबल सुखदर्शन, होमगार्ड स्वयंसेवक राजेश आणि अन्य एका व्यक्तीचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. आरोपी चालकाने आपली गाडी घटनास्थळीच सोडून पळ काढला. यानंतर पोलिसांनी जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी सुरू केली. गाडीच्या नंबरच्या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवत त्याला अटक केली. आता पोलीस दलाकडून त्याची अधिक चौकशी सुरू आहे. कारचालकाविरुद्ध सेक्टर 31 पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








