हातकणंगले/प्रतिनिधी
हातकणंगले पोलीस स्टेशन मधील पोलीस नाईक नामदेव औदुंबर कचरे (वय ३६) याला आज २ हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिथंबध पथकाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदारच्या विरुद्ध न्यायालयामध्ये अटक वॉरंट काढला होता. सदर अटक वॉरंट प्रकरणांमध्ये अटक न करता तुम्हाला मदत करू असे आश्वासन देऊन त्यांच्याकडून दोन हजार रुपयाची लाच मागण्यात आली. सदर लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाचे अधिकारी पोलीस निरीक्षक नितीन कुंभार, संजीव बंबर्गेकर, हेड कॉन्स्टेबल शरद पोरे, विकास माने, पोलीस नाईक सुनील घोसाळकर, नवनाथ कदम, मयूर देसाई , विष्णू गुरव यांनी ही कारवाई केली. पर्यवेक्षक अधिकारी म्हणून अधिनाथ बधुवत यांनी काम केले. अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांचे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.