रत्नागिरी :
पोलिसांत तक्रार करणाऱ्या व्यक्तीला गुह्याच्या तपासाची स्थिती कळावी यासाठी ‘मिशन प्रगती’ व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी ‘मिशन प्रतिसाद’ राबविण्यात येणार आह़े ‘मिशन प्रतिसाद‘ हा उपक्रम ज्येष्ठ नागरिकांच्या सहाय्यासाठी सुरू करण्यात आला आहे. त्यांच्या तक्रारी, अडचणी किंवा मदतीची गरज असल्यास दोन मोबाईल क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत़ तसेच ‘मिशन प्रगती’च्या माध्यमातून तक्रारदाराला तपासकामाची माहिती प्राप्त होणार आहे. या मोहिमेमुळे तपासकामातील पारदर्शकता वाढेल, असा विश्वास पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
पोलीस अधीक्षक कार्यालयातील मंथन सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बगाटे बोलत होत़े ते म्हणाले, जिह्यात अनेकवेळा पाऊस किंवा अन्य कारणांमुळे पोलीस ठाण्यांमधील दूरध्वनी लागत नाहीत़ यामुळे जनतेची अडचण होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार आता प्रत्येक पोलीस ठाण्यासाठी स्वतंत्र मोबाईल नंबर निश्चित करण्यात आले आहेत. हे सर्व नंबर ‘सिमकार्ड बेस लँडलाइन‘ स्वरूपात कार्यरत असून नागरिक थेट संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधू शकतील. तपास, तक्रारी किंवा अन्य पोलीस कामकाजासाठी या क्रमांकांचा उपयोग केला जाऊ शकतो. पोलीस ही केवळ कायदा-सुव्यवस्थेची यंत्रणा नसून समाजाच्या कल्याणासाठी कार्यरत असलेली बांधील संस्था आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न या उपक्रमांद्वारे करण्यात येत आहे, असे सांगत अधीक्षक बगाटे यांनी पुढील काळात आणखी नागरिकाभिमुख उपक्रम राबविणार असल्याचे सांगितल़े.
- जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे नवे मोबाईल क्रमांक
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय (9684708301), अपर पोलीस अधीक्षक (9684708302), उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नागिरी (9684708303), उपविभागीय पोलीस अधिकारी लांजा (9684708304), उपविभागीय पोलीस अधिकारी चिपळूण (9684708305), उपविभागीय पोलीस अधिकारी खेड (9684708306), रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे (9684708315), जयगड सागरी पोलीस ठाणे (9684708321), पूणर्गड पोलीस ठाणे (9684708323), लांजा पोलीस ठाणे (9684708313), देवऊख पोलीस ठाणे (9684708314), संगमेश्वर पोलीस ठाणे(9684708317), चिपळूण पोलीस ठाणे (9684708310), सावर्डा पोलीस ठाणे (9684708319), खेड पोलीस ठाणे (9684708308), राजापूर पोलीस ठाणे (9684708311), नाटे पोलीस ठाणे (9684708322), दापोली पोलीस ठाणे (9684708307), दाभोळ पोलीस ठाणे (9684708324), बाणकोट पोलीस ठाणे (9684708320), मंडणगड पोलीस ठाणे (9684708312), अलोरे शिरगांव पोलीस ठाणे (9684708318), गुहागर पोलीस ठाणे (9684708309).
- हे आहेत दोन महत्वाचे मोबाईल क्रमांक
ज्येष्ठांसाठी 9684708316 या विशेष मोबाईल क्रमांकावर संपर्क करता येणार आहे. यासोबतच ‘प्रतिसाद हेल्पलाइन’ साठी स्वतंत्र क्रमांक 8390929100 देखील देण्यात आला असल्याचे बगाटे यांनी सांगितल़े
- तटरक्षक दलाशी चांगल्या पद्धतीने समन्वय साधू- बगाटे
रत्नदुर्ग किल्ल्यावरून उडी घेत आत्महत्या करणाऱ्या तऊणीच्या शोधकार्यात तटरक्षक दलाशी संपर्क साधण्यात आला होत़ा मात्र घटनेच्या दिवशी समुद्राला उधाण आल्याने शोधकार्य अडचणीचे होत़े त्यामुळे तटरक्षक दलाला हॅलिकॉप्टरने शोध घेण्यास विनंती करण्यात आली होत़ी मात्र त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नाह़ी अखेर चिपळूणहून एनडीआरएफचे पथक सायंकाळी 4 नंतर दाखल झाले. सुऊवातीच्या काळातील शोधकार्य अधिक फायदेशीर ठरले असते, भविष्यात अशा प्रसंगी मदतीसाठी अधिक चांगल्या पद्धतीने तटरक्षक दलाशी समन्वय साधला जाईल, असे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सांगितल़े








