रत्नागिरी :
रत्नागिरी शहर व लगतच्या परिसरात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरुद्ध रत्नागिरी पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात आल़ी रत्नागिरी शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून प्रशांतनगर येथे साडेपाच किलो गांजासह एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले तर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून नाचणे येथे 154 ब्राऊन हेरॉईनच्या पुड्यांसह एकाला अटक केल़ी मागील 8 दिवसातील पोलिसांची सलग ही तिसरी कारवाई ठरली आह़े त्यामुळे अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
मागील काही दिवसांमध्ये रत्नागिरी जिह्यात काही इसम अमली पदार्थाची खरेदी–विक्री करीत आहेत, अशी माहिती रत्नागिरी पोलिसांना मिळाली होती. या अनुषंगाने रत्नागिरी शहरात अमली पदार्थविरोधी कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिल्या होत्या. 7 एप्रिल रोजी सायंकाळी 5.30 च्या सुमारास रत्नागिरी शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक श्याम आरमाळकर व पोलीस अंमलदार हे कोकणनगर ते प्रशांतनगर अशा परिसरात गस्त घालत होत़े साई–भूमी नगर बिल्डींगच्या मागील बाजूस आले आसता त्या ठिकाणी एक इसम संशयास्पद हालचाल करत असताना दिसला. त्याची पोलिसांनी थांबवून चौकशी केली असता त्याने आपले नाव मन्सूर अली निजाम पठाण (40, रा. मिरज जि. सांगली) असे सांगितल़े मन्सूर याची पोलिसांनी झडती घेतली असता त्याच्याकडून 5 किलो 55.5 ग्रॅम वजनाचा 3 लाख 25 हजार 500 ऊपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल़ा
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरीचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाला नाचणे–गुऊमळी रस्त्यावर अमली पदार्थाची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होत़ी त्यानुसार 7 एप्रिल रोजी नाचणे रोड ते गुऊमळीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या आडोशाला एक इसम दुचाकीवर बसून संशयास्पद हालचाल करत असल्याचे पोलिसांना आढळला. त्यानुसार त्याची तपासणी केली असता पोलिसांना 154 ब्राऊन हेरॉईनच्या पुड्या आढळल्य़ा अदनान नाजीममियाँ नाखवा (25, रा. जुना फणसोप, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आह़े त्याच्या ताब्यातून पोलिसांनी 154 पुड्या हेरॉईन व दुचाकीसह एकूण 2 लाख 5 हजार ऊपयांचा मुद्देमाल जप्त केल़ा
शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांच्याकडून अटक करण्यात आलेल्या दोन्ही संशयितांविऊद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे एन.डी.पी.एस. अॅक्ट 1985 नुसार गुन्हा दाखल झाल़ा ही कारवाई शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून पोलीस उपनिरीक्षक श्याम आरमाळकर, सहाय्यक पोलीस फौजदार दीपक साळवी, हवालदार अऊण चाळके, अमोल भोसले, आशिष भालेकर, पंकज पडेलकर, भालचंद्र मयेकर, कॉन्स्टेबल अमित पालवे, कौस्तुभ जाधव यांनी केल़ी तर गुन्हे अन्वेषण शाखेच्यावतीने पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, सहा. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, हवालदार शांताराम झोरे, नितीन डोमणे, बाळू पालकर व गणेश सावंत यांनी कारवाई केल़ी








