ऑनलाईन टीम / तरुण भारत :
सत्ताधाऱ्यांमुळे राज्यातील पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी तणावाखाली काम करत आहेत, असा आरोप विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला आहे.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अजित पवार म्हणाले, महाराष्ट्रातील पोलीस आणि प्रशासन देशात सर्वोत्तम असल्याचं म्हटलं जातं. परंतु, शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून राज्यातील पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी प्रचंड तणावाखाली काम करत आहेत. पोलिसांना वरिष्ठ पातळीवरुन आदेश येतात. त्यामुळे एखाद्यावर अन्याय होत असला तरी त्यांचा नाईलाज होतो. मंत्रालयातील अधिकाऱ्यांना तर थेट सीएमओमधून फोन येतात. हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही. गेल्या चार महिन्यांपासून सुरु झालेली ही परिस्थिती अशीच राहिली तर राज्याचं चित्र गंभीर व्हायला वेळ लागणार नाही.
अधिक वाचा : राज्यात जिल्हानिहाय मेडिकल कॉलेज उभारणार
नेत्यांना सुरक्षा पुरविण्याच्या मुद्यावर ते म्हणाले, अनेक नेत्यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. माजी नगरसेवकांनाही सुरक्षा देण्यात आली आहे. काहींच्या ताफ्यात तर 30-30 वाहनं आहेत. खरचं त्याची गरज आहे का?, हा पैसा टॅक्सच्या रुपाने जमा झालेला आहे. मी माहिती मागवली आहे की किती जणांना वाय प्लस दर्जा आहे.