पोलीस यंत्रणेचे आरवली व सागरतीर्थ भागातील जनतेसाठी आयोजन
वेंगुर्ले (वार्ताहर)-
सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्हयांमध्ये पोलीस ग्रामसंवाद अंतर्गत श्रीदेव वेतोबा देवस्थान, अन्नशांती सभागृह येथे सायबर गुन्हयांबाबत व वाहतूक नियमांबाबत आणि लोकांच्या सूचना व समस्यांबाबत आरवली व सागरतीर्थ ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ग्रामस्थांना मार्गदर्शन कार्यक्रम वेंगुर्ले पोलीस निरीक्षक संदिप भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्गदर्शनाने संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या उपस्थितीत श्रीदेव वेतोबा देवस्थानच्या सभागृहात सायबर गुन्हयांबाबत व वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन करण्यात आले . यावेळी व्यासपीठावर श्री देव वेतोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जयवंत राय, आरवली गावचे उपसरपंच किरण पालयेकर, महिला पोलीस हेडकॉन्टेबल सावी पाटील, ट्रॅफिक पोलीस मनोज परूळेकर, गौरव परब, शिरोडा बीटचे हेड कॉन्स्टेबल अनंत हडकर, अजित जाधव, आरवलीचे सामाजिक कार्यकर्ते तथा आंबा बागायतदार पुरूषोत्तम दळवी उपस्थित होते . यावेळी श्री देव वेतोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जयवंत राय, ट्रॅफिक हवालदार मनोज परूळेकर आरवली गावचे उपसरपंच किरण पालयेकर, पोलस पाटील मधुसुदन मेस्त्री यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास खास उपस्थित प्रमुख मान्यवरांत आरवली ग्रामपंचायत सदस्य प्रवीण मेस्त्री, तातोबा कुडव, सौ. सायली कुडव, सौ. अक्षदा नाईक, सौ. रिमा मेस्त्री, सागरतीर्थ ग्रामपंचायत सदस्य ज्ञानदेव चोपडेकर, मेरी फर्नांडिस, समृध्दी कुडव, सागरतीर्थ तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शाणू सोज, बाळू फटनाईक, विलास चिपकर, आरवलीचे माजी उपसरपंच मयुर आरोलकर, सुभाष आरोलकर, उमेश मेस्त्री, बाळा मेस्त्री, बाळू वस्त, आशा सेविका व पोलीस कर्मचारी तसेच पोलिस पाटील विश्वनाथ सोन्सुरकर (सोन्सुरे), संजय मोरजकर (सखैलेखोल), केशव कुडव (टेंब), बाबुराव चोपडेकर (टांक), आरवली तलाठी सतिष गावडे, कोतवाल संजय मेस्त्री इत्यादी मान्यवर व इतर ग्रामस्थ यांचा समावेश होता. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन आरवलीचे पोलीस पाटील मधुसूदन मेस्त्री यांनी केले.









