प्रतिनिधी/ रत्नागिरी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील तिन्ही जिह्यातील पोलीस यंत्रणा येथील कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी अलर्ट करण्यात आली आहे. त्यासंदर्भात रत्नागिरी, सिंधुर्द्गु, रायगड जिह्यातील पोलीस अधीक्षकांनी आवश्यक ती खबरदारी घेतली आहे. गणेशोत्सव, आपत्ती अंतर्गत सुरक्षा यावर लक्ष केंद्रीत करण्याच्या सुचना सर्व पोलीस अधीक्षकांसह प्रभारी अधिकाऱयांना करण्यात आल्याची माहिती कोकण परीक्षेत्र पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते यांनी दिली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते यांनी या तिन्ही जिह्यांच्या आढवा घेतला आहे. गणेशोत्सवात कोकणासह रत्नागिरी जिह्यात सर्वाधिक चाकरमानी येतात. त्यावेळी गावातील राजकीय वाद, तसेच जुने वाद प्न्हा डोके वर काढतात. त्यामुळे पोलीस यंत्रणेला सतर्क करण्यात आलेले आहे. ज्या गावे, वाडय़ांना या पूर्वी गणेशोत्सवातील वादाची पार्श्वभूमी आहे. त्या गावांना भेटी देवून सध्याची वस्तूस्थिती जाणून घेण्याची सूचना प्रभारी पोलीस अधिकारी, डिवायएसपी यांना यापुर्वीच देण्यात आल्या आहेत. त्यानुसार त्यांनी गाव भेटी दिल्या का? याचा आढावा घेण्यात आला. त्या भेटीचा अहवालही संबधित अधिकाऱयांनी वरिष्ठांना सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
गणेशोत्सवाच्या मुंबई, पुण्यातील चाकरमानी मोठय़ा प्रमाणात रत्नागिरी जिह्यात दाखल होणार आहेत. त्यामुळे जिह्यांच्या सीमेवर तसेच , मुंबई-गोवा महामर्गावरील प्रमुख ठिकाणी दरवर्षी प्रमाणे तंबू उभारून चाकरमान्यांच्या मदतीसाठी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. महामार्गावर अपघात झाल्यास त्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी रुग्णवाहिकेसह नजीकच्या रुग्णालयात सुसज्ज यंत्रणा उपलब्ध आहे का? याचा आढवा घेण्यात आला आहे. तर ज्या ठिकाणी सुविधा उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी तात्काळ सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात असे आदेश दिल्याचे संजय मोहिते यांनी सांगितले.
जिल्ह्य़ातील ज्या गांवामध्ये धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असते. अशा गावांमध्ये अतिरिक्त लक्ष देण्यात येणार आहे. ज्या धार्मिक स्थळांवरुन मिरवणूका जातात तेथे शांतता कमिटिच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. जिह्यात दोन्ही समाजामध्ये एकोपा नांदत आहे. हिच पंरपरा कायम राहण्यासाठी पोलीस दल प्रयत्न करत असल्याचे कोकण परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते यांनी सांगितले.
गणेशोत्सवासाठी अतिरिक्त पोलीस फौजफाटा राहणार तैनात
गणेशोत्सवाच्या बंदोबस्तासाठी तिन्ही जिल्हय़ांना पोलीस, होमगार्ड, राज्य राखीव पोलीसांची तुकडया पाठवण्यात आल्या आहेत. रत्नागिरी जिल्हय़ात 300 अतिरिक्त होमगार्ड दाखल झाले आहेत. तर राज्य राखीव दलाच्या दोन तुकडय़ा लवकरच जिल्हय़ात दाखल होणार आहेत. तसेच जिल्हय़ातून प्रशिक्षण घेण्यासाठी बाहेर गेलेल्या कर्मचाऱयांनाही बंदोबस्तासाठी पुन्हा बोलवण्यात येणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या बंदोबस्तात कोणताही कमतरता ठेवली जाणार नसल्याचे पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते यांनी सांगितले.









